Girish Mahajan | गिरीश महाजन यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले – ‘एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात’

Girish Mahajan | girish mahajan gave answer to eknath khadse on statement made by khadse against him.

जळगाव : बहुजननामा ऑनलाइन  – Girish Mahajan | जळगाव जिल्ह्यात (Jalgaon News) वेगळंच राजकारण ढवळून निघालं असल्याचं चित्र समोर दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे (BJP) आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून महाजन आणि खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं भाष्य केलं होतं. यानंतर आता गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. ‘एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत,’ अशी टीका महाजन यांनी केली आहे.

 

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काही वृत्तपत्रांशी फोनवर बोलताना खडसे यांच्यावर मोक्का लागण्याच्या भीतीने कोरोना झाल्याच्या वक्तव्यावर टीका करताना एकनाथ खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते.
गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी काल (रविवारी) उत्तर दिलं आहे.
‘आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला ॲडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत दाखवायला हवे,’
अशा शब्दात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

 

 

 

गिरीश महाजन म्हणाले, ‘एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळताय,’ असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे.
‘खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करतायेत, असा आरोप देखील गिरीश महाजन यांनी केला आहे.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे.

 

Web Title :-  Girish Mahajan | girish mahajan gave answer to eknath khadse on statement made by khadse against him.

 

Eknath Khadse | एकनाथ खडसेंची भाजपवर घणाघाती टीका; म्हणाले – ’40 वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच…’

Buldhana Crime | मुख्याध्यापकाचा शाळेतच डर्टी पिक्चर ! महिलेला काम असल्याचं सांगुन शाळेत बोलवलं अन्…

Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा वाढला ! गेल्या 24 तासात 41 हजारांहून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी