Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट आजचे दर

Gold Silver Price Today | Gold silver rate in india today on 10 january 2022 sonya chandi che dar.

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन   – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,610 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर (Gold Silver Price Today) उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर गतवर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा भाव कमी आहे.

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

 

 

 

आजचे सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,650 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये

आजचा चांदीचा भाव – 60,700 रुपये (प्रति किलो).

 

Web Title :-  Gold Silver Price Today | Gold silver rate in india today on 10 january 2022 sonya chandi che dar.

 

PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर

UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

PM kisan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला दरवर्षी 6000 बरोबर 36000 रुपये मिळतील, तात्काळ करा ‘हे’ काम

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे किती दिवसांनी जाणवते? WHO ने सांगितले – ‘अशी करा आपली इम्युनिटी बूस्ट’