नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात टाकेद ग्रा.पं.चे सदस्य रामचंद्र परदेशी यांची नाशिक जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात राजपूत – परदेशी समाजाच्या वधू – वर मेळाव्याबाबत चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुनीलसिंह परदेशी, नाशिक जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी, नाशिक जिल्हा संघटन मंत्री मिलिंदसिंह परदेशी, नाशिक जिल्हा युवा महामंत्री योगेशसिंह राजपूत, नाशिक जिल्हा संघटनमंत्री विजयसिंह परदेशी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुरेशसिंह चौहाण, नाशिक जिल्हा महिलाध्यक्ष संध्या राजपूत, नाशिक जिल्हा महिला कार्याध्यक्ष स्नेहा परदेशी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भारती राजपूत, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी परदेशी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुनीता परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यात सर्वच बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या वधू-वर मेळाव्याव्यतिरिक्त ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. एकाच राजपूत समाजाला शासनाने वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट केले आहे, तर काहींना कुठल्याही प्रवर्गात समाविष्ट केलेले नाही. ज्यांना व्हीजेएनटी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र पाहिजे असेल, त्यांच्याकडे १९६१ पूर्वीचे सक्षम पुरावे मागितले जातात. या संदर्भात राज्य शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व राजपूत समाज एका छत्राखाली व एका प्रवर्गाखाली आणावा, सर्वांना व्हीजेएनटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे, यासाठी पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती रामचंद्र परदेशी यांनी केली. यावर सुनीलसिंह परदेशी म्हणाले, शासन दरबारी हा विषय मार्गी लावून समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील.
टाकेद ग्रा.पं.चे सदस्य रामचंद्र परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन परदेशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बाळू परदेशी, ईश्वर परदेशी, लक्ष्मण परदेशी, विकास परदेशी, अविनाश परदेशी, भरत परदेशी, गजानन परदेशी, जनार्दन परदेशी, दिलीप परदेशी, ज्ञानेश्वर परदेशी, जय परदेशी, भरत परदेशी, सदाशिव परदेशी, मोहन परदेशी, गणेशप्रसाद मिसर, केशव परदेशी, दत्तू परदेशी, प्रमोद परदेशी आदींसह टाकेद, परदेशवाडी, अधरवड येथील महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.