NGT Fine To PMC Pune | राष्ट्रीय हरित लवादाकडून पुणे महापालिकेला 1 कोटी 79 लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?
पुणे : – NGT Fine To PMC Pune | पुण्यातल्या वाघोलीतील (Wagholi Dagadkhana) दगडखाना कामगार वस्तीजवळ बेकायदा कचरा डेपो उभारुन पर्य़ावरणाची हानी केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्याधिकरणाने पुणे महानगरपालिकेला दणका दिला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महानगरपालिकेला Pune Municipal Corporation (PMC) तब्बल 1 कोटी 79 लाखांचा 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हा दंड भरण्यासाठी मुदत देखील दिली आहे.
बेकायदा कचरा डेपो उभारुन पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal-NGT) पुणे महानगरपालिकेला 1 कोटी 79 लाख 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या ठिकाणी पुन्हा कचरा न टाकण्याचा आदेश देखील महापालिकेला देण्यात आला आहे. तसेच दंडाची रक्कम दोन महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पालिकेला दिले आहेत.
वाघोली येथील दगडखान कामगारांची वस्ती आहे. याठिकाणी 2015 पासून कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे दोन ते तीन एकर जागेवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वस्तीत दुर्गंधी परसरल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वस्तीच्या ठिकाणी कचरा टाकू नका, तसेच कचऱ्याचे डेपो दुसरीकडे हलवावेत यासाठी 2016 मध्ये तक्रार करण्यात आली होती.
दगडखान कामगार परिषदेच्या वतीने 2016 मध्ये संतुलन संस्थेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे या संदर्भात तक्रार केली होती. या प्रकरणाचा निकाल बुधवारी (दि. 15 मे) लागला आहे. हा निकाल देताना न्यायाधिकरणाने पुणे महानगरपालिकेला दंड ठोठावला असून दंडाची रक्कम भरण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे.
Rajni Tribhuvan | भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन
Comments are closed.