Pune News | संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

May 15, 2024

पुणे : – वाराणसी या ठिकाणी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना जाहीर प्रचार सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरे टोप घालून सत्कार केला.याविषयी त्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने जोडे मारण्यात आले.

यावेळी महानगराध्यक्ष अविनाश भाऊ मोहिते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राचे ते भूषण आहेत अशा महापुरुषाचा जाणून-बुजून अपमान करणे आम्ही खपून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप म्हणजे सर्वोच्च सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला राज तिलक झाला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने राजे झाले त्याचेच प्रतीक म्हणून शिरावरती जो राजमुकुट ठेवण्यात आला तो मुकुट म्हणजे जिरे टोप होय. आज तागायत या टोपाचा राजकीय वापर कुठेच केला गेला नव्हता एवढेच काय त्यांचे थेट वंशज असणारे उदयन महाराज भोसले सातारा गादी किंवा छत्रपती श्रीमंत संभाजी राजे कोल्हापूर गादी यांनी सुद्धा आजतागायत हा जिरेटोप आपल्या डोक्यात घातला नाही. मग हे प्रफुल पटेल कोण लागून गेलेत की ज्यांनी तो जिरे टोप नरेंद्र मोदी यांना घातला.

लाखो मावळ्यांनी जेव्हा आपल्या प्राणांची आहूती दिली आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्य निर्माण झाले. म्हणून सर्वांच्या त्यागाचे शौर्याचे प्रतीक तो राजमुकुट म्हणजेच जिरे टोप आहे. कोणीही कुठेही याचा गैरवापर करू नये. असे करणे म्हणजे एक प्रकारचा राजद्रोहच आहे. एवढं साधं गणित सुद्धा न समजण्याइतपत प्रफुल पटेल वेडपट नाहीत.डोक्यावरती पडलेले नाहीत.मला असं वाटतंय की हा जो प्रकार घडला आहे तो जाणून बुजून केलेला आहे.

म्हणून प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्रातील जनतेची शिवप्रेमींची मावळ्यांची जाहीर माफी मागावी.

अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रफुल पटेल यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे प्रतिपादन महानगराध्यक्ष अविनाश मोहिते.यांनी आमच्या वार्ताहर सी बोलताना केले.

यावेळी महानगराध्यक्ष अविनाश मोहिते.सचिव अर्जुन जागडे.कार्याध्यक्ष अविनाश घोडके. अभिजीत मोरे. शंकर तात्या कुटे.माया पवार.व्यंकट मानपिडी. मल्लेश मानपीडी.वैभव घोडके.प्रदीप घोडके. प्रशांत गाडे.मिखाईल सरोदे.संजय चव्हाण. संतोष शिंदे.आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gangapur Nashik Crime News | नाशिक : मोटार सायकल चोरीचा गुन्हा 24 तासात उघड, 4 दुचाकी जप्त (Video)