बहुजननामा ऑनलाइन टीम – तुम्ही खिशात ठेवले जाणारे पीव्हीसी आधार कार्ड बनवले आहे का? बनवण्याची पद्धतही खुप सोपी आहे, तुम्ही घरबसल्या(Work story) अप्लाय करू शकता, आणि स्पीड पोस्टद्वारे(Work story) तुमच्यापर्यंत हे आकर्षक दिसणारे, आणि अनेक वर्ष चालणारे आधारकार्ड पोहचेल. हे कार्ड एकदम एटीएमकार्डसारखे आकर्षक दिसते. हे बनवण्याची पद्धत जाणून घेवूयात…
या नव्या पीव्हीसी आधार कार्डच्या क्यूआर कोडद्वारे कार्डची सत्यता तात्काळ होईल. कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. यात अधुनिक सिक्युरिटी फिचर्स आहेत. नव्या कार्डमध्ये एक होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स आहेत.
या कार्डावर पाण्याचाही परिणाम होणार नाही. हे मिळवण्यासाठी 50 रूपये भरावे लागतील. ज्यानंतर हे स्पीड पोस्टद्वारे घरी येईल. डिलिव्हरीसाठी कोणताही चार्ज लागणार नाही. घरबसल्या हे कार्ड कसे मागवायचे ते जाणून घेवूयात…
अशी आहे प्रक्रिया
1 सर्वप्रथम युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in
2 आधार नंबर टाकल्यानंतर खाली सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड टाका. यानंतर खाली सेंड ओटीपीवर क्लि करा. ज्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची प्रीव्ह्यू कॉपी येईल, ज्यामध्ये डिटेल्स असतील.
3 शेवटी पेमेंट ऑपशन येईल. त्यावर क्लिक करून अनेक डिजिटल माध्यमाने 50 रुपये भरू शकता. 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने कार्ड तुमच्या घरी पोहचेल.