बहुजननामा ऑनलाइन टीम – वेस्ट इंडीजचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौर्यावर आहे. येथे खेळाडू 14 दिवसांच्या क्वाॅरंटाइनमध्ये आहेत, परंतु काही खेळाडूंनी क्वाॅरंटाइनचे (West Indies players banned )नियम तोडले आहेत, ज्यामुळे वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंच्या सरावावर बंदी आणली गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने खेळाडूंवर ही कारवाई केली आहे.
न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, क्राइस्टचर्च येथील टीमच्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून आले आहे की, खेळाडू एकमेकांशी मिसळत होते आणि एकत्र खाणे, एकत्र बसणे हे नियमांचे उल्लंघन आहे. वेस्ट इंडीज संघाने 14 पैकी 12 दिवस आपला क्वाॅरंटाइन पूर्ण केला आहे आणि हा कालावधी पूर्ण होईपर्यंत सराव करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
क्वाॅरंटाइनचे दिवस वाढवले जाऊ शकतात
वेस्ट इंडीज क्रिकेटला सीसीटीव्ही फुटेजदेखील पाठविण्यात आले होते. त्यात स्वत:ची तपासणी करून आवश्यक असल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. खेळाडूंचा दुसरी कोरोना चाचणी बुधवारी होणार आहे. त्यानंतर हा संघ क्वीन्सटाउन येथे जाईल, तेथे त्यांचे न्यूझीलंड-ए विरुद्ध दोन सराव सामने आहेत. अशा परिस्थितीत खेळाडूंना यापूर्वी सराव करता येणार नाही.
न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले की, या घटनेची माहिती त्यांना मिळाली होती आणि मंत्रालयाच्या या निर्णयाचे समर्थन केले. तीन देशांच्या टी -20 मालिका 27 नोव्हेंबरपासून दोन्ही देशांदरम्यान सुरू होत आहे. यानंतर वेस्ट इंडीज आणि यजमान कीवी संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. टी-२० मालिकेचा पहिला सामना 27 नोव्हेंबरला ऑकलंडमध्ये, दुसरा सामना 29 नोव्हेंबरला माउंट मुन्गुई आणि तिसरा सामना 30 नोव्हेंबरला त्याच मैदानावर होईल. त्याचबरोबर, 3 डिसेंबर रोजी हॅमिल्टनमध्ये कसोटी मालिका सुरू होईल, तर दुसरा कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये 11 डिसेंबर रोजी खेळला जाईल.