उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – युपीमध्ये एक वेगळेच प्रकरण समोर आले असून एका शेतकऱ्याने वाजत-गाजत दुर्गा माता मंदिरात आपल्या म्हशीच्या बाळाचे मुंडन संस्कारचे केले. हे मुंडन संस्कार पाहण्यासाठी गावातील लोकं मंदिरात मोठ्या संख्येने आले होते आणि आनंदाने या आयोजनातही सहभागी झाले होते. गावात असलेल्या दुर्गा माता मंदिरात या मुंडन संस्कारात बेकायदेशीरपणे केस कापले आहेत. या शिवाय मुंडनचा दुसरा विधीही केला गेला आहे.
हे प्रकरण फतेहपूर जिल्ह्यातील खागा तहसीलच्या सरोली गावातील असून गावात राहणाऱ्या जयचंद्र सिंह यांनी हा सोहळा आयोजित केला होता. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या म्हशीने जितक्या वेळा रेडक्यांना जन्म दिला, ते वाचले नाहीत. त्यामुळे यावेळी आनंदाने मुंडन आयोजन केले गेले. त्यांनी सांगितले कि बाळाच्या मरण्याने नुकसान तर होतेच सोबतच म्हैस दूध देणेही बंद करते. याने चिंतेत असलेल्या जयचंद्र यांनी गावात असलेल्या मंदिरात नवस मागत जर आता त्यांच्या म्हशीने बाळाला जन्म दिला तर गावात असलेल्या दुर्गा माता मंदिरात त्याचे मुंडन संस्कार करणार.
काही दिवसानंतर जयचंद्र यांची इच्छा पूर्ण झाल्यावर वाजत-गाजत मुंडन संस्कराचे आयोजन केले. दुर्गा माता मंदिरात मुंडन केल्यानंतर आपल्या म्हशीची मुले जिवंत राहतील अशी अपेक्षा जयचंद्र यांना आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्याने दुर्गा माता मंदिरात नवस मागितला असल्याने त्यांची म्हैस ठीक आहे आणि ती बाळासोबतच दूधही देत आहे.