नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात पहिल्यांदाच नवजात अर्भकामध्ये कोरोना व्हायरस सापडले असून हा सर्वात लहान मुलाला कोरोना व्हायरस झाल्याचे प्रकरण आहे. इंग्लंडच्या या नवजात अर्भकाला कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले असून त्याच्या आईला वाटत होते कि त्याला न्यूमोनिया झाला आहे. जव्हा आईने आपल्या बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा समजले कि त्या अर्भकाला कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहे. आता आई आणि बाळाला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
एका वृत्तसंस्थेनुसार नवजात अर्भक रुग्णालयात पोहोचल्यावर काहीच वेळाने समजले कि त्याला कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे. आता डॉक्टरांना हि गोष्ट समजली आहे कि नवजात अर्भक जन्माच्या दरम्यान संक्रमणाचा शिकार झाला किंवा आईच्या गर्भातच त्याला संक्रमित झाले असेल. बाळाला हॉस्पिटलमध्ये ठेवले असून आईला दुसऱ्या स्पेशालिस्ट इन्फेक्शन वाल्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केले आहे.
संक्रमनंतरही बाळाला आईचे दूध देण्याचा सल्ला
आई आणि बाळाच्या देखरेखीसाठी करण्यात आलेल्या स्टाफलाही आयजोलेशन मध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी कोणत्या परिस्थितीत संक्रमण झाले आहे, हे माहिती करत आहेत. रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टीट्रीशियन्स अँड गायनॉकॉलॉजिस्टकडून बाळाला आईपासून वेगळे ठेवण्याचा सल्ला दिला गेला आहे. संक्रमण झालेले असतानाही बाळाला त्याच्या आईचे दूध मिळणे गरजेचे आहे. पण आरोग्य अधिकाऱ्यांकडून म्हटले जात आहे कि बाळ आणि आई कमीत कमी धोक्यात असून त्यांच्यात व्हायरसची लक्षणे हलकी दिसत आहेत.