नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरस विरुद्ध लढाईसाठी वेगवेगळे उपाय केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला जागतिक महामारी घोषित केली असून जगभरातील वैज्ञानिक त्याच्यावर लस तयार करत आहेत. कारण लस हीच कोविड-१९ चा शेवटचा उपचार आहे. यादरम्यान अमेरिकेकडून चांगली बातमी येत असून तिथे लसीची नैदानिक चाचणी सुरु आहे.अमेरिकेच्या सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चाचणीच्या आधी सोमवारी प्रायोगिक लस दिली जाणार आहे. चाचणीबाबत सार्वजनिक स्तरावर सध्या तरी कोणतेही घोषणा केलेली नाही. तसेच नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थने या चाचणीला फंड देत आहे, जो सिएटलच्या कॅन्सर परमानेंट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये होत आहे, असेही त्याने सांगितले.
सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे कि कोणतीही संभाव्य लस पूर्णपणे मान्य करण्यासाठी एक वर्ष ते १८ महिन्यांचा कालावधी लागतो. चाचणी ४५ युवा स्वयंसेवकांद्वारे सुरू होईल, ज्यांना एनआयएच आणि मॉर्डना इंक यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार केलेल्या लस दिल्या जातील. तथापि, प्रत्येक सहभागीला वेगवेगळ्या प्रमाणात इंजेक्शन दिले जाईल. या लसीमध्ये व्हायरस नसल्यामुळे कोणीही त्याद्वारे संक्रमित होण्याची शक्यता नाही. या चाचणीचे लक्ष्य फक्त हेच आहे की, लसींचे कोणतेही चिंताजनक दुष्परिणाम होत नाहीत आणि नंतर या आधारावर मोठ्या प्रमाणात चाचणी केली जाऊ शकेल. कोविड -१९ च्या वाढत्या घटनांमध्ये जगभरातील डझनभर संशोधन संस्था लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
न्यूयॉर्कमध्येही शाळा बंद
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहून न्यूयॉर्कमध्येही सोमवारी सगळ्या शाळा बंद राहणार आहेत, ज्यामुळे तब्बल ११ लाख मुलांना घरी बसावे लागणार आहे. शहराच्या महापौर बिल डी ब्लाजियो यांनी घोषणा केली कि कमीत कमी २० एप्रिलपर्यंत शाळा बंद राहतील आणि कदाचित शाळांचे वार्षिक सत्र पूर्ण होईपर्यंत त्या बंद राहतील. यामुळे शहराच्या जवळजवळ १,९०० खाजगी शाळांवर परिणाम होणार असून अनेक खाजगी शाळा पहिल्यापासूनच बंद आहेत. गव्हर्नर अँड्रूयु कुओमो यांनी अगोदरच शाळा बंद होण्याची घोषणा केली होती. पण तेव्हा या शाळा मंगळवारपासून बंद होणार होत्या.