नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगात खळबळ उडाली असून आता या महामारीबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीने विधान केले आहे. इवांकाने ट्विट करत म्हटले आहे कि ‘राष्ट्रपती ट्रम्प यांचा मजबूत पाठिंब्यासह कोरोना व्हायरस प्रतिसाद कायदा मजूर झाला आहे.’
https://twitter.com/IvankaTrump/status/1238848771364175873
या अंतर्गत कोविड-१९ चाचणी मोफत होणार असून अमेरिकन कामगारांना पगारी रजेची तरतूद आहे. बेरोजगारी विमा आणि लागू व्यापार सुरक्षा/ मदतीची व्यवस्था केली गेली आहे. इवांकाने म्हटले कि कोरोनाचा प्रभाव पाहता विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांघिक सरकारी एजन्सींद्वार आयोजित विद्यार्थी कर्जावरील व्याज माफ केले आहे.
यानंतर इवांकाने राष्ट्रपती ट्रम्पच्या त्या ट्विटलाही रिट्विट केले ज्यात ट्रम्प यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे कि युनायटेड स्टेट इटलीवर प्रेम करते.