बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सैफ अली खाान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा लाडका तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आपल्या क्युटनेसमुळं नेहमीच चर्चेत येत असतो. त्याचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ नेहमीच सोशलवर व्हायरल होत असतो. पुन्हा एकदा आपल्या काही फोटोंमुळं तैमूर चर्चेत आला आहे. तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ समोर यायचा उशीर असतो की, क्षणातच ते व्हायरल होताना दिसत असतात. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत तैमूरचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. तैमूर चक्क वडिलांसोबत शेती करताना दिसत आहे.
तैमूरचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत तैमूर वडिल सैफ अली खान सोबत शेतीत काम करताना दिसत आहे. सैफला तो कामात मदत करताना दिसत आहे. सैफ आणि तैमूरचे हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.
सैफ आणि तैमूरचा हा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिलीआहे. अनेकांनी तैमूरचा असा अंदाज पाहून त्याचं कौतुक केलं आहे. त्याचा क्युटनेस चाहत्यांना कायमच आवडत असतो.
सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजी सिनेमानंतर आता तो जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. 31 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अलाया फर्निचरवाला आणि तब्बू प्रमुख भूमितकेत होत्या.
https://www.instagram.com/p/CHSPQrFB-u7/
https://www.instagram.com/p/CFwvd45BSid/