Aaditya Thackeray On BJP | अब की बार जनता भाजपला तडीपार करणार – आदित्य ठाकरे डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करावे असे आवाहन

May 11, 2024

चाकण : Aaditya Thackeray On BJP | मोदी सरकारने (Modi Govt) २०१४ चा निवडणूक जे जमले केलं तेच २०२४ च्या निवडणूक ग्यारंटी म्हणून लोकांना सांगत आहेत, त्यामुळे अबकी बार ४०० पार होणार नाही तर जनता भाजपला तडीपार करणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं.

चाकण मध्ये महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi NCP Candidate) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जेष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यासभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap MLA) , आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde MLA), माजी आमदार राम कांडगे, प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

चाकणच्या बाजार समितीच्या (Chakan Bazar Samiti) आवारात झालेल्या या सभेला महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना पळायची सवय लागली त्यांना महत्व द्यायचे नसतं. महाराष्ट्रात दोन तीन टप्प्यात निवडणुका होतील असं वाटलं होत, पण उद्धव ठाकरे सोबत नसल्याने भाजपला पाच टप्प्यात निवडणुका घ्याव्या लागल्या आहेत.पंतप्रधान च्या सभा वाढल्यात. मागच्या दहा वर्षात बहुमताचे, एका नेत्याचे सरकार होते त्यांनी केलं तरी काय, असा सवालही ठाकरे यांनी केला.

2014 प्रत्येकाला घर मिळेल असे आश्वासन दिले होते. शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करणार होते ते झाल का? असा सवालही ठाकरे यांनी केला. 2014 मध्ये जुमले होते ते 2024 मध्ये गॅरंटी म्हणून लोकांच्या समोर आणलेत. गद्दाराच्या घरी पन्नास खोके गेले मग आपल्या घरी 15 लाख का नाही आले, असा सवाल करत भाजपला हद्दपार करण्याचे आव्हान केलं.

Khadki Pune Crime News | पुणे : नोकरीचे आमिष दाखवून 9 जणांना लाखोंचा गंडा, 5 जणांवर FIR