बहुजननामा ऑनलाइन टीम – लहान पडद्यावरील सर्वात सुपरहिट नागिन, अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नेहमीच आपल्या हॉट फोटोंनी(Bold ) कायमच अटेंशन घेत असते. पुन्हा एकदा तिचे काही फोटो समोर आले आहे जे चर्चेत आले आहेत. जेव्हा मौनी बिकीनी घालते तेव्हा तिच्या हॉटनेसला चार चांद लागतात यात शंकाच नाही. सध्या मौनी आपल्या हॉट आणि बोल्ड(Bold ) फोटोंमुळं सोशलवर चर्चेत आल्याचं दिसत आहे.
मौनी रॉयनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. या फोटोत मौनी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. मौनी रॉयचा बिंधास्त अंदाज पाहण्यासारखा आहे. चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड अवतार आवडला आहे. सध्या मौनीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. मौनीच्या अनेक चाहत्यांनी फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 4 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार आहे. 2006 साली एकता कपूरची मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी मधून तिनं करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय अक्षय कुमारच्या गोल्ड या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला आहे. नागिन या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.