Nora Fatehi | ‘हे’ गुण असणार्‍यासोबत रिलेशनशिपमध्ये रहायला आवडेल, नोरा फतेहीनं सांगितलं

 Nora Fatehi | nora fatehi would be husband should have this quality

बहुजननामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi | बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या नृत्यासाठी तसेच तिच्या फिगरसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. नुकतच नोराचं एक म्युझिक अलब्न प्रदर्शित झालं आहे. ज्यामध्ये अनेकांना तिचा लुक पाहून हाॅलिवूड गायक शकिराची (Shakira) आठवण झाली आहे.

नोराचं नुकतच प्रदर्शित झालेल्या गाण्याचं नाव ‘डान्स मेरी रानी’ (Dance Meri Rani) असं असून तिच्या या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे. यावेळी ती एका शो मध्ये आली असता, तिला कशा मुलासोबत प्रेमसंबंध करायला आवडेल हे तिने सांगितलं आहे. यावेळी तिने मुलगा क्रिएटिव्ह असला पाहिजे अशी अट सांगितली आहे.

आपली मागणी सांगत असताना नोराने तिला हवा असणाऱ्या मुलाला स्केच देखील काढता आलं पाहिजे अशी अट सांगितली आहे. हे सर्व ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (India’s Best Dancer) या शोच्या स्टेजवर झालं असून नोराच्या आयुष्यातील तो मुलगा बनण्यासाठी टेरेंस लुइस आणि गुरु रंधावानेनी स्केच काढण्याचा प्रयत्न देखील केला.

 

नुकतेच 200 कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग (Money Laundring) उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Ferdandez) नाव घेतले होते. चौकशीदरम्यान सुकेशने जॅकलीनला लाखोंची गिफ्ट दिल्याचे सांगितले होते.

 

 

https://www.instagram.com/tv/CX8j_IVvh-e/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याशिवाय अभिनेत्री नोरा फतेहीचे (Nora Fatehi) नावही आरोपपत्रात घेण्यात आले आहे. सुकेशच्या म्हणण्यानुसार, त्याने नोराला एक महागडी कार गिफ्ट केली होती.
याप्रकरणी दोन्ही अभिनेत्रींची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली होती.
ईडीच्या चौकशीदरम्यान नोरा फतेहीने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.
आता या प्रकरणात आणखी एक बातमी समोर आली आहे,
ज्यानुसार नोरा फतेही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार होणार आहे.

 

Web Title :- Nora Fatehi | nora fatehi would be husband should have this quality