नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं विधान माजिद मेमन यांनी केलं आहे. ‘भाजपाविरोधातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवावं. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास, शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं मोठं विधान मेमन यांनी केलं आहे. देशाला एका अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी पंतप्रधान होतील का ? असे विचारले असता माजिद मेमन यांनी सांगितले कि राहुल गांधीनी पवारसाहेबच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे मान्य केल्यामुळेच महाआघाडी झालेली आहे असेही मेमन बोलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आपल्या अनेक भाषणात विरोधकांवर टीका करताना ‘महामीलावट कि सरकार’ आहे अशी टीका करत असतात निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. जी लोक विरोधी पक्षनेतेदेखील होऊ शकत नाही, तिच लोक आता पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.