मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी फेसबुकने रिलायन्स जिओ मध्ये ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ९.९९ टक्के भागीदारी घेतली होती. त्यानंतर आता अमेरिकेतील इक्विटी फर्म सिल्वर लेक (Equity Firm Silver Lake) या कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ५,६५५.७५ कोटी रुपयांची गुतंवणूक करून १.१५ टक्के भागीदारी घेतली आहे. फेसबुक आणि जिओ मध्ये झालेल्या या करारामुळे भारतात टेलिकॉम आणि डिजिटल मीडियासाठी तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मार्क झुकनबर्ग यांनी व्यक्त केला होता. आता इक्विटी फर्म सिल्वर लेक या कंपनीसोबत झालेल्या करारानंतर मुकेश अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सिल्वर लेक फर्म ही तंत्रज्ञानात जगभरात नावाजलेली कंपनी असून, तिच्याकडे जगभरातील सुमारे ४३ अरब डॉलर्सची संपत्ती आहे. तर जवळपास १०० गुंतवणूकदार आणि कार्यकारी व्यावसायिकांची टीम आहे. यापूर्वी सिल्व्हर लेकने अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, दीदी चकिंग, हायला मोबाईल, अँट फायनान्शियल, एल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटरमध्ये गुतंवणूक केलेली आहे.
जिओ हा रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅटफॉर्ममधील कंपनी आहे. त्याशिवाय माय जिओ, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन तसंच या कंपनी मार्फत शिक्षण, आरोग्य आणि कृषी या सेवा रिलायन्स डिजिटल माध्यमातून देते.
एनपी न्यूज24 नेटवर्क