बहुजननामा ऑनलाईन – भारत-चीन सीमेवर अत्यंत वाईट स्थिती असून चीन खूप कठोरपणा दाखवत आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे . त्यांनी पुन्हा एकदा भारत-चीन सीमावादात मध्यस्थता करण्याची तयारी दाखवली आहे.
I hope not. But, they are certainly going at it much more strongly than a lot of people even understand: US President Donald Trump on being asked if China is bullying India pic.twitter.com/QqTzHgZ1kU
— ANI (@ANI) September 4, 2020
भारत आणि चीन दोघांशी चर्चा सुरु असल्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. आम्ही दोघांची मदत करायला तयार आहोत. हा वाद सोडवण्यात मदत करु शकलो, तर आनंदच आहे. आमची दोन्ही देशांबरोबर त्याबद्दल चर्चाही सुरु आहे असे डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले. चीन भारताला धमकावत आहे का? या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, असे असू नये अशी मी अपेक्षा करतो, पण निश्चितपणे चीन तसे वागत आहे. चीन खूप कठोरपणा दाखवत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी काश्मीर प्रश्नी सुद्धा मध्यस्थता करण्याची तयारी दाखवली होती. पण भारताने तिसर्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही असे स्पष्ट केले होते.
It has been very nasty situation and we stand ready to help with respect to China and India. If we can do anything we would love to get involved and help. We are talking to both countries about that: US President Donald Trump pic.twitter.com/czyMH2SPq7
— ANI (@ANI) September 4, 2020