Pune Pimpri Crime | महापालिकेत खोटी कागत्रपत्र देऊन वकिलाची फसवणूक, भावावर FIR; चिंचवडमधील प्रकार

Pune Crime News | Action taken against bully who threatens even after returning money with 10 percent interest

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन  Pune Pimpri Crime | लहान भावाने चालवण्यासाठी घेतलेल्या दुकानाची खोटी कागदपत्रे (Fake Document) व प्रतिज्ञापत्र (Affidavits) सादर करुन दुकान नावावर करुन घेत वकील (Lawyer) असलेल्या मोठ्या भावाची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार (Pune Pimpri Crime) समोर आला आहे. हा प्रकार 2018 ते 2019 या कालावधीत चिंचवड येथे घडला आहे. याप्रकरणी लहान भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अनिल आबा सुपेकर Anil Aba Supekar (वय-65 रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी मारुती आबा सुपेकर Maruti Aba Supekar (वय-70 रा. काशी विश्वेश्वर सोसायटी, केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) रविवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती सुपेकर हे वकील असून त्यांचे चिंचवड येथील
गावडे कॉलनीत (Gawade Colony) राजुफिश मर्चंट नावाचे दुकान आहे.
हे दुकान त्यांनी लहान भाऊ अनिल सुपेकर याला चालवण्यास दिले आहे. फिर्यादी यांच्या भावाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) करसंकलन विभागात खोटे कागदपत्र व खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन दुकान आपल्या नावावर करुन घेतले.

 

याशिवाय अनिल सुपेकर यांनी बेकायदेशीरपणे स्वत:च्या नावावर पाण्याचे कनेक्शन घेतले.
तसेच खोटी कागदपत्र महावितरण विभागाला (MSEDCL) सादर करुन आपण जागेचे मालक असल्याचे
भासवून विजेचे कनेक्शन घेऊन फिर्यादी, महापालिका आणि महावितरण कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Fraud of lawyer by giving fake document in Municipal Corporation, FIR on brother; Type in Chinchwad

 

हे देखील वाचा :

Satyajeet Tambe | ‘माझ्यावरील घराणेशाहीचा आरोप चुकीचा’ सत्यजीत तांबेंचे टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर

Maharashtra Politics | शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा

Narayan Rane | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘त्या’ पत्राची होतेय चांगलीच चर्चा