Maharashtra Politics | परभणीत शिंदे गटात इनकमिंग सुरूच; सईद खान यांनी दिला इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics | Incoming continues in Parbhanit Shinde group; Saeed Khan allowed workers from other parties to join the Shinde group

परभणी : बहुजननामा ऑनलाईन(Maharashtra Politics) शिवसेना पक्षातील फूटीनंतर शिवसनेचे दोन गट तयार झाले. त्यानंतर दोन्ही गटांकडून विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. त्यात नुकतच परभणी येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी सईद खान (Saeed Khan) यांनी देखील शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यानंतर परभणीत सईद खान हे चांगलेच कामाला लागले असून परभणीत त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. (Maharashtra Politics)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी बोलताना शिंदे गटाचे नेते सईद खान म्हणाले की, शिवसेनेच्या शिंदे गटात येण्यास अनेक इच्छुक असून, ते पक्षाशी जोडले जात आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर सईद यांनी प्रवेश करणाऱ्यांचे आभार मानले. तसेच यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) यांच्यावर जोरदार टीका केली.

 

ते म्हणाले की, पाथरी शहराचा विकास झाला नसून केवळ आमदार बाबाजान दुर्रानी यांच्या परिवाराचा विकास झाला आहे. स्वार्थापुढे त्यांना कार्यकर्ते दिसत नाहीत. त्यांच्यावरील नाराज अनेक जण पक्षासोबत जोडले जात आहेत.
अशी टीका त्यांनी आमदार बाबाजान दुर्रानी यांच्यावर केली आहे.
तसेच पाथरी नगरपालिका हद्दीतील भूखंडावर नियम मोडून बांधकाम केले गेले आहे.
याची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी बाबाजान दुर्रानी यांच्याविरोधात न्यायालयात पुरावे सादर करून
याचिका दाखल करणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सईद खान म्हणाले. (Maharashtra Politics)

 

तसेच आमदार दुर्रानी यांच्यावर गुन्हेगार असल्याची टीका करत त्यांनी दुर्रानी यांच्या कुटुंबावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती यावेळी बोलताना दिली.
तसेच यासंबंधीची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही यावेळी बोलताना सईद खान
म्हणाले.बाहेरच्या पक्षातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. हे चालणार नाही.
याप्रकरणी इतर पुराव्यांसहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही यावेळी बोलताना सईद खान म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी शिंदे गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सईद खान यांच्याकडू सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदविली.

 

Web Title :- Maharashtra Politics | Incoming continues in Parbhanit Shinde group; Saeed Khan allowed workers from other parties to join the Shinde group

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | महापालिकेत खोटी कागत्रपत्र देऊन वकिलाची फसवणूक, भावावर FIR; चिंचवडमधील प्रकार

Satyajeet Tambe | ‘माझ्यावरील घराणेशाहीचा आरोप चुकीचा’ सत्यजीत तांबेंचे टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर