Satyajeet Tambe | ‘माझ्यावरील घराणेशाहीचा आरोप चुकीचा’ सत्यजीत तांबेंचे टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Satyajeet Tambe | मी आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता असून माझ्यावर घराणेशाहीचा आरोप चुकीचा. असे जोरदार प्रतिउत्तर नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी टीकाकारांना दिले. ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यावर येण्याअगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, मुंबईत बसलेल्या लोकांना ग्राऊंड परिस्थिती माहित नाही. ग्राऊंडवरील लोकं प्रेमाने माझ्याबरोबर जोडली गेली आहेत. निवडणुक जिंकणं हा महत्वाचा मुद्दा नाही, मात्र निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपर्यंत जाणे संपर्क करणे आणि त्यांचा प्रश्न समजावून घेणे, त्यांचा असलेला ऋणानुबंध व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व काँग्रेस (Congress) पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्ते माझ्यासोबत असून या ठिकाणी एक पक्ष नाहीत, तर शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) काँग्रेस सगळे आहेत. आणि पक्षाला हीच ग्राऊंडवरची स्थिती माहित नसल्याचे यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले.
‘मी आज नाशिक आणि धुळे प्रचार दौरा करणार आहे. सात दिवस निवडणुकासाठी बाकी असून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. युवकांनी निवडणुक हाती घेतली आहे. युवकांचे प्रश्नांबरोबरच उद्योगांबाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी एक हक्काचा प्रतिनिधी मिळणार आहे, असे युवकांचे मत आहे. गेली २२ वर्षे संघटनेत काम करतोय. वयाच्या १७ व्या वर्षी राजकारणाला सुरूवात केली. देशातलं असं एकही राज्य नाही जिथे मी पोहोचलो नाही. राज्यातील एकही तालुका नाही जिथे पक्षसंघटनेचे काम मी केले नाही. माझ्यावर काल परवापर्यंत ५० केसेस आंदोलनाच्या होत्या. त्यामुळे मला पासपोर्ट मिळत नव्हता. मी आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता असून माझ्यावर घराणेशाहीचे आरोप चुकीचे आहेत.’ असेही यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
२००९ पासून आम्ही सर्व पक्ष, सगळ्या जाती, विविध संघटना यांना एकत्र घेऊन पदवीधर मतदारसंघात काम करतो.
हीच डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी मतदारसंघात निर्माण केलेली ताकद आहे.
ज्यांना तांबे परिवार माहित आहे, त्यांना सगळ्यांना माहित आहे की, आम्ही कधीही कोणाची फसवणूक करू शकत नाही.
त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी मदत करा, राजकीय भाष्य नंतर करेल, सध्या तुमच्याशी संवाद साधने महत्वाचे आहे.
त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात फिरतो आहे.
मतदारसंघातील हक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी एक हक्काचा प्रतिनिधी मिळणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले.
Web Title :- Satyajit Tambe | satyajeet tambe on tour of nashik district today
हे देखील वाचा :
Maharashtra Politics | शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा
Pandharpur Crime News | पंढरपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळला मृतदेह
Comments are closed.