Maharashtra Politics | शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Mahrashtra Politics | शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) युतीची घोषणा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत केली. गेल्या अनेक दिवसांपासून उभय पक्षांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यावर या दोन्ही पक्षाची युती होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यावर आज दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेत शिक्कामोर्तब केला. (Mahrashtra Politics)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर या युतीची घोषणा महत्वाची मानली जाते. देशातील लोकशाही आणि देशहित जपण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, हिंमत असेल तर निवडणुक घ्या, असे आव्हान देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला दिले. या युतीबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चर्चा झाली असून त्यांना ही युती मान्य असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक म्हणुन तुम्हाला मान्यता देण्यास हरकत नाही. महाविकास आघाडीमध्ये सामंज्यस्याचे राजकारण करण्याची नितांत गरज असल्याचेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (VBA Chief Prakash Ambedkar) म्हणाले की, उपेक्षितांच्या राजकारणाची सुरूवात व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. जिंकणे राजकीय पक्षांच्या हातात नाही, पण उमेदवारी देणे हातात आहे. शरद पवार आमच्या आघाडीसोबत येतील. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही, तर मुद्यांचं भांडण आहे. ईडीच्या माध्यमातून देशातील राजकीय नेतृत्व संपविण्याचा घाट घातला जात असल्याचे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Mahrashtra Politics)
शिवसेनेच्या फूटीनंतर उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी (Sambhaji Brigade) युती केली होती. दरम्यान, नुकतीचं प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपची (BJP) साथ सोडली तर आम्ही त्यांच्याशी युती करण्याचा विचार करू. अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ही युती शिवशक्ती आणि भीमशक्ती विचारांची आहे. असे म्हटले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती ही प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीवर आधारीत असेल.
असे मत याअगोदरच प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते.
आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणुक (BMC Election) होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर ही युती महत्वाची असल्याचे बोलले जाते.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ही युती झाली असली
तरी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी यावर मौन बाळगलं आहे.
Web Title :- Maharashtra Politics | shivsena uddhav balasaheb thackeray faction and vanchit bahujan aghadi announced their alliance
हे देखील वाचा :
Pandharpur Crime News | पंढरपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळला मृतदेह
Comments are closed.