पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन करत विनयभंग (Molestation) करणाऱ्या 26 वर्षीय तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) रविवारी (दि.22) सकाळी दहाच्या सुमारास बोकडेवाडी, माण येथे घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 30 वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली. तर नितेश जाधव Nitesh Jadhav (वय-26 रा. हिंजवडी) याच्यावर आयपीसी 354 (अ), 452 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच कंपनीत सेक्युरिटी गार्ड (Security guard) म्हणून कामाला आहेत. त्यामुळे त्यांच्यात तोंडओळख आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास फिर्य़ादी या घरी असताना आरोपी घरी आला. त्याने पिण्यासाठी पाणी (Drinking Water) मागितले.
फिर्यादी या पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेल्या असता आरोपी घरात शिरला.
पाण्याचा ग्लास घेताना आरोपीने फिर्यादी यांचा हात पकडून अश्लील चाळे करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला आहे.
पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख (API Sandeep Deshmukh) यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Pimpri Crime | Incident in Hinjewadi, a security guard molested a woman by entering the house on the pretext of drinking water
हे देखील वाचा :
Pandharpur Crime News | पंढरपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळला मृतदेह
Pune-Amravati Crime News | पुण्यातील 8 कैद्यांचा अमरावती कारागृहात राडा