पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – थायलंड येथील थाई अॅक्वा कंपनीत Thai Aqua Company भागादारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून गुजरातमधील दोघांनी एकाची २२ लाख रुपयांची फसवणूक केली. हेमिन जसुभाई खोखर (रा. नाना वराछा, सुरत) आणि दिव्यांग कानुभाई डोबारीया ( रा. मोठा वराछा़ सुरत) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत प्रभुदास ठक्कर (वय ५४, रा. विश्रांतवाडी) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान भोसरी एमआयडीसीमध्ये घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमिन आणि दिव्यांग यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. थायलंड देशातील बँकॉक येथील थाई अॅक्वा कंपनीचा Thai Aqua Company भोसरी एमआयडीसीमध्ये कारखाना होता. या कंपनीत भागीदारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे आमिष दाखविले. त्यांना कंपनीत २२ लाख रुपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडले. कंपनीच्या नफा तोट्याचा हिशोब न देता तसेच कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कमेची मागणी करुनही परत दिली नाही. परस्पर ही कंपनी बंद करुन कंपनीतील मशिनरी सुरत येथे घेऊन गेले. तेथे दुसरी कंपनी स्थापन करुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.
दुचाकी दुरुस्त करुन देण्यास दिला नकार, तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खून
दुर्दैवी ! मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून 8 गाभण मेंढ्या ठार तर 16 जखमी
भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच’
भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी