पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव दुचाकी चालकाने रस्ता क्रॉस करणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीला उडवल्याची घटना घडली आहे. यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. दत्तवाडी(Dattawadi) परिसरात ही घटना घडली आहे.
सिया शशिकांत भिसे (वय 7) असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची मावशी प्रिया दीपक भोसले (वय 30) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चार दिवसांपूर्वी म्हसोबा चौकाजवळ घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीची मुलगी सिया ही म्हसोबा चौकाजवळील ऊर्जा डेअरीसमोरून रस्ता क्रॉस करत होती. यावेळी समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने तिला जोरात धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. मात्र, अपघातानंतर चालक येथे न थांबता पसार झाला. नागरिक व नातेवाईकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस तपास करत आहेत.
तेजश्री प्रधाननं पहिल्याच हिंदी सिनेमात दिलाय लीप लॉक, चित्रपट अद्याप…
नवी मुंबईत भाजपला हादरे सुरुच, मोठ्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश
‘पवित्र रिश्ता 2’ करण्यास उषा नाडकर्णी यांचा नकार, जाणून घ्या कारण