मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. तसेच अनेक मुद्द्यावरून देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(gadkari) चांगल्या प्रकारे करतील असे सर्वत्र चर्चा काही दिवसापूर्वी होत होती. तसेच आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे (gadkari) कौतुक केले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांबाबत गांभीर्याने विचार करतात. मी लेखाच्या माध्यमातून तसेच ट्विटरद्वारे त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. परंतु, याचा अर्थ मी त्यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करतो असं होत नाही. नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती आहेत, असे खोचक कौतुकही त्यांनी केलं आहे.
या दरम्यान, मागील काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे अनेकजण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे सोशल मीडियावरून उघडपणे सांगत आहेत. तसेच सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे, मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या कारकीर्दीची सात वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. दरम्यान, गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. त्यातच देशात दुसरी लाट आल्यानंतर कोरोनाबाबतचे सरकारचे नियोजन फसल्याची टीका केली जात आहे.
खेड सभापती विरोधातील अविश्वास ठरावावर आज निर्णय; राजगुरूनगरमध्ये संचारबंदी
खळबळजनक ! हुकूमशहा किम जोंग उनचा संताप; बेकायदेशीर CD विकणाऱ्यावर 500 जणांसमोर झाडल्या 12 गोळ्या
CBSE, ICSE बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षा होणार की नाही ?, विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अनिश्चित
इंडियन आयडॉलमध्ये आणखी एक ‘प्रेमकथा’? सायली कांबळे म्हणाली – ‘माझं त्याच्यावर प्रेम’