मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप (BJP) ला नवी मुंबईत मोठा धक्का बसला आहे. कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकत वाढवण्यासाठी इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग सुरु असताना भाजपला कळंबोलीमध्ये नितीन काळे यांच्या मनसे प्रवेशाने मोठा धक्का बसला आहे.
नवी मुंबईत मागिल काही दिवसांपासून भाजपमध्ये पडझड पहायला मिळत आहे. भाजपचे अनेक नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. नितीन काळे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला असून आगामी नवी मुंबई निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील शहापूरमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
‘पवित्र रिश्ता 2’ करण्यास उषा नाडकर्णी यांचा नकार, जाणून घ्या कारण
‘नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती’
खेड सभापती विरोधातील अविश्वास ठरावावर आज निर्णय; राजगुरूनगरमध्ये संचारबंदी
खळबळजनक ! हुकूमशहा किम जोंग उनचा संताप; बेकायदेशीर CD विकणाऱ्यावर 500 जणांसमोर झाडल्या 12 गोळ्या