पुणे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाला (Vaccination) परवानगी दिली. मात्र राज्यात लसीचा अपुरा पुरवठा असल्याने लसीकरण(Vaccination) काही दिवस थांबवले. कालांतराने लसीकरणाला हळूहळू सुरु केले गेले. तर पुणे शहरात २२ मे ते २९ मे या आठ दिवसामध्ये तरुणवर्गातील ७४ हजार ६९१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे़. एवढी उचांकी पातळी गाठली आहे. खासगी हॉस्पिटलमधील लसीकरणाने तरुणांना एक दिलासा दिला आहे.
पुणे शहरातील १८ ते ४४ वयोगटातील तरुणवर्गाचे लसीकरणाची टक्केवारीही ७५ % आहे. २२ मेपासून पुन्हा सुरू झालेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण प्रक्रियेत प्रारंभी दिवसभरात ५६० पर्यंत असलेला हा आकडा दिवसेंदिवस दुप्पट होत गेला असून, २९ मे रोजी एका दिवसात या वर्गातील १० हजार २६८ जणांना लस देण्यात आली़ या दिवशी दिवसभरात एकूण ११ हजार ९८९ लसीकरण झाले होते़. पुणे शहरात या वयोगटातील सुमारे २५ लाख लोकसंख्या आहे़. दरम्यान, राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना अजूनही महापालिकेच्या केंद्रांना परवानगी दिलेली नाही़ मात्र, खासगी रुग्णालयात पुणे शहरात २२ मे पासून लसीकरण सुरू झाले.
या दरम्यान, पुणे शहराने आजपर्यंत एकूण १० लाखांचा लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. तर शहरात १८ वर्षांवरील जवळपास ३२ लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पुणे महानगरपालिकेने ठेवले आहे. याला खासगी रुग्णालयांतील लसीकरणाने २२ मेपासून मोठी उभारी दिली आहे़. म्हणून आत्तापर्यंत झालेल्या एकूण १० लाख २५ हजार ५७३ जणांच्या लसीकरणामध्ये २ लाख ५६ हजार २३८ जणांचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत़.
पुणे शहरातील एकूण लसीकरण –
वर्ग पहिला डोस दुसरा :
> आरोग्य कर्मचारी – ६०,०२१ ४६,२०६
> फ्रं ट लाईन वर्कर – ७०,२६० २५,४०५
> ज्येष्ठ नागरिक – २,८३,८०२ १,३१,२४०
> ४५ ते ५९ वर्ष – ३,००,३८३ ५३,३८७
> १८ ते ४४ वर्ष – ५४,८६९ ..
थायलंडच्या कंपनीत गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणूक
दुचाकी दुरुस्त करुन देण्यास दिला नकार, तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खून
दुर्दैवी ! मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून 8 गाभण मेंढ्या ठार तर 16 जखमी
भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच’
भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी