पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुरेसे शिक्षण नाही, त्यामुळे नोकरी नाही, घरची गरीबी, त्यामुळे जगण्यासाठी छोटा मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्यांना गल्ली बोळातील गुंडांचा त्रास सहन करावा लागत आहे. गल्ली बोळातील या भाईगिरी करणार्यांचा व्यावसायिकांना वाढता त्रास होत आहे.
कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील (MG Road Camp Pune) कपडे विक्रेत्याला एका टोळक्याने पालघनचा धाक दाखवून खिशातील ३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.
लष्कर पोलिसांनी शानु शेख (वय २०) व इतर चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सद्याम असिमुद्दीन हुसेन Saddam Asimuddin Hussain (वय २३, रा. भवानी पेठ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हुसेन हे महात्मा गांधी रोडवरील सोरगामा यादुकानासमोर फुटपाथवर कपडे विक्री करतात. ७ डिसेबर रोजी साडेअकरा वाजता ते कपडे विक्री करत असताना शानु शेख व त्याचे ४ साथीदार तेथे आले. त्यांनी हुसेन यांना फुटपाथवर धंदा लावण्याकरीता हप्ता मागितला. तेव्हा हुसेन यांनी त्याला नकार दिला.
त्यावर त्यांनी शिवीगाळ करुन पालघनचा धाक दाखवून हुसेन यांच्या पँटच्या खिशातील
अंदाजे ३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने (Pune Crime) काढून घेऊन निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर (API Shilimkar) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | robbery by knife on MG Road Camp Pune case registered in lashkar police station
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 68 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Pune Crime | रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड; रिक्षासह 3 दुचाकी जप्त