पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. गुरुवारी पुणे शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 239 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 68 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 51 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे कोरोना अपडेट : गुरुवार दि. ९ डिसेंबर २०२१
◆ उपचार सुरु : ७९२
◆ नवे रुग्ण : ६८ (५,०७, ४१६)
◆ डिस्चार्ज : ५१ (४,९७,५१८)
◆ चाचण्या : ६२३९ (३७,३४,७३६)
◆ मृत्यू : १ (९,१०६)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/IOPFik5kU5— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 9, 2021
पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये 68 रुग्णांचे निदान (Pune Corona) झाले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 07 हजार 416 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 518 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरात सध्या 792 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 37 कोटी 94 लाख 736 प्रयोगशाळा तपासणीमध्ये 5 लाख 7 हजार 416 पुणेकरांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे. सध्या शहरामध्ये 85 रुग्ण गंभीर आहेत. तर 43 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 9106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title : Pune Corona | Corona 68 new patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Pune Crime | रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड; रिक्षासह 3 दुचाकी जप्त
Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर
Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री
OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका