नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sanjay Raut | शिवसेना नेते (Shiv Sena) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वापरलेल्या त्या शब्दावरुन भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्या शब्दावरुन भाजप आणि संजय राऊत परस्परांस भिडलेले दिसत आहे. दरम्यान राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील भाजपने केलीय. पण संजय राऊत आपल्या शब्दावर ठाम असून, काय तक्रार करायची ती करा, अशा शब्दात त्यांनी भाजपला फटकारलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना टीकाकारांना या असा शब्द वापराल होता. दरम्यान, त्यानंतर भाजपने (BJP) त्यावर आक्षेप घेऊन संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. यावरुन आता राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘या अशिक्षित आणि अडाणी लोकांना काही कळत नाही. हे लोक हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात, पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले तर मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख असा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे संजय राऊत म्हणाले, ‘टीकाकारांनी अभ्यास केला पाहिजे. मला वाटले होते भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. त्यांचे वाचन चांगले आहे. ते रामभाऊ म्हाळगी सारखी संस्था चालवतात. तिथे सुशिक्षित कार्यकर्ते निर्माण करतात, असं वाटत होतं. परंतु, अशा प्रकारचे कार्यकर्ते ते निर्माण करतात हे मला माहित नव्हतं,’ असा टोला देखील राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.
तर, त्यांचेच नेते आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनीही तो शब्द अनेकदा वापरला आहे. त्यांचे 15 ट्विट दाखवेन, त्यांनी विविध प्रकारे हा शब्द वापरला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेशातील अनेक नेते हा शब्द वापरतात, कारण तिथला ग्रामीण भागातील तो शब्द आहे. मी दिल्लीत आहे, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात असतो तर कदाचित हा शब्द नसता वापरला. पण इथली ती बोलीभाषा आहे, त्यामुळे सर्वांना समजेल उमजेल असा शब्द वापरला. तो शब्द योग्यच, कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Web Title : Sanjay Raut | sanjay raut says i never used unparliamentary words