मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
आजही (शुक्रवारी) सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर देखील उतरले आहेत. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,840 रुपये आहे. तर, चांदीची किंमत 61,600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरताना दिसत आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्यात घसरण होताना दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात (MCX) वर सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या वर होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यंदा तोच दर 50 हजाराच्या आत आहे. यामुळे गुंतवणुकदारांसाठी सध्या योग्य संधी उपलब्ध झाली आहे. (Gold Price Today) दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.
सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा दर – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,550 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,840 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,840 रुपये
आजचा चांदीचा भाव – 61,600 रुपये (प्रति किलो).
Web Title :- Gold Price Today | gold silver rate in india today on 10 december 2021
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 68 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी