पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 54 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 7 हजार 670 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 54 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 879 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 63 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 73 हजार 771 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 326 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 193 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 133 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दिवसभरात 2,390 जणांचे लसीकरण
आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2 हजार 390 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 27 लाख 27 हजार 471 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 54 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics.
Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर
PM kisan tractor yojna | खुशखबर – सरकार शेतकर्यांना देत आहे 50% सबसिडी, ताबडतोब घ्या योजनेचा लाभ
Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्यांना देत आहे 50% सबसिडी, तात्काळ घ्या योजनेचा लाभ