पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी Bhaichand Hirachand Raisoni (BHR)चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी (Pramod Hirachand Raisoni) यांच्यासह तिघांवर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) ११ कोटी २३ लाख रुपयांचा अपहार (Cheating Case) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (वय ५३, रा. शिवाजी पार्क, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ३८३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत मणिलाल संघवी Prashant Manilal Sanghvi (वय ५५, रा. मणिभवन, आदर्शनगर, जळगाव), संदेश मिश्रीलाल चोपडा
Sandesh Mishrilal Chopra (वय ५४, रा. बळीराम पेठ, जळगाव) आणि प्रमोद भाईचंद रायसोनी (रा. जळगाव – Jalgaon) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भोसरीतील प्रसन्न गोल्डफिल्ड च्या कार्यालयात २४ मे २०२३ रोजी घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सेक्टर नंबर ११, प्लॉट नं. १ येथील एकूण ४४०० चौ़ मी़ क्षेत्रावर
पी ३ डेव्हलपर्स भागीदारी संस्थेच्या वतीने ६२ दुकाने, कार्यालये बांधण्यात आली.
फिर्यादी यांनी काही जणांकडून आगाऊ पैसे घेऊन त्यांची विक्री केली आहे.
आरोपींनी २३ मे रोजी ११ वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करुन एकूण ६२ दुकाने स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी
संस्थेच्या नावे केली आहेत. त्यामध्ये फिर्यादी यांनी मेहता, कासवा, पटेल यांना विक्री केलेल्या १६ दुकानांचा समावेश आहे.
आरोपींना अधिकार नसताना सुमारे ११ कोटी २३ लाख २० हजार रुपयांचे अपहार करुन एकूण ६२ दुकाने,
ऑफिसेस स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक स्पेक्ट्रम भागीदारी संस्थेच्या नावे ११ वेगवेगळ्या
दस्ताद्वारे करारनामा करुन फसवणूक (Fraud Case) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
- पुणे: वारजे पोलिसांकडून दोघांना पिस्टलसह अटक, 7 काडतुसे जप्त
- फोक्सवेगन कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांकडून गुडगाव,
हरियाणा येथून आरोपीला अटक - पुण्यात तब्बल 4970 किलो बनावट पनीरचा साठा जप्त, कर्नाटकातून आणलेल्या पनीरची छोट्या हॉटेल
अन् दुकानदारांना विक्री; गुन्हे शाखेची मोठी कारवाई (Video) - लोणी धामणीतील शाळेसाठी पुनीत बालन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त स्कूल बस भेट