Pune Cyber Police News | फोक्सवेगन कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांकडून गुडगाव, हरियाणा येथून आरोपीला अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Cyber Police News | फोक्सवेगन कंपनीत (Volkswagen Company) सिनियर जनरल मॅनेजर या पदावर (Senior General Manager) नोकरी देण्याचे आमिष (Lure of Job) दाखवुन 12 लाखांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार (Pune Crime News) पुण्यात घडला होता. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) गुडगाव हरियाणा येथून अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून फसवणुकीची रक्कम जप्त केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई 24 ऑगस्ट रोजी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपींनी फिर्यादी यांना शालिनी शर्मा (Shalini Sharma) आणि करण सिंह (Karan Singh) यांच्या विविध मोबाईलवरून संपर्क केला. आरोपींनी फिर्यादी यांना Top Career Consultancy या सल्लागार कंपनीमध्ये काम करत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आयडीवर hrshalinisharma12142029@gmail.com आणि rmkaransingh@topcar eerconsultancy.com या मेलआयडीवरुन संपर्क केला.
आरोपींनी फिर्यादी यांना Volkswagen Group या कंपनीत परदेशात सिनियर जनरल मॅनेजर पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगुन शालिनी शर्मा व करण सिंह यांनी https://pg.sambhavpay.com/93Xexaaaxfax या लिंकवर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 11 लाख 91 हजार 419 रुपये भरले. पैसे भरल्यानंतर फिर्यादी यांना नोकरी मिळाली नाही. तसेच त्यांचे पैसे ही परत मिळाले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी 18 जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station Pune) तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 419, 420, 34, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला.
सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police News) दाखल गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले मोबाईल, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. त्यावेळी आरोपी दिल्ली (Delhi) व गुड़गांव हरियाणा (Gurgaon Haryana) येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने गुडगांव येथे जाऊन फिर्यादी यांना संपर्क करुन फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपी जयंत कुमार मलिक (Jayant Kumar Malik) पुत्र परमानंद मलिक Parmanand Malik (वय-29 रा. पार्क व्ह्यू रेसीडेन्सी, सेक्टर 6, फ्लॅट नं. 906, पालमविहार, गुडगाव, हरियाणा) याला अटक केली.
पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने आरोपीला पुणे सायबर पोलीस ठाण्यात घेऊन आले.
पुण्यात आणून आरोपीकडे सखोल चौकशी केली असता आरोपनीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीकडून एक लॅपटॉप, तीन मोबाईल व गुन्ह्यातील फसवणुकीची 12 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता 29 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील (Senior PI Minal Supe-Patil) करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वर नमूद मोबाईल क्रमांक, ईमेल आयडीचा वापर करुन
कोणाची फसवणुक झाली असेल तर अशा नागरिकांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात संपर्क करावा.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त नंदा पाराजे
(ACP Nanda Paraje) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील,
पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव (PSI Sachin Jadhav), संदीप कदम (PSI Sandeep Kadam),
पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, रेणुका रजपुत, निलम नाईकरे यांच्या पथकाने केली.
- पुण्यात तब्बल 4970 किलो बनावट पनीरचा साठा जप्त, कर्नाटकातून आणलेल्या पनीरची छोट्या हॉटेल अन् दुकानदारांना विक्री; गुन्हे शाखेची मोठी कारवाई (Video)
- लोणी धामणीतील शाळेसाठी पुनीत बालन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त स्कूल बस भेट
- मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती
Comments are closed.