पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Punit Balan Group | युवा उद्योजक पुनीत बालन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Punit Balan Birthday) आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावातील शाळेसाठी स्कूल बस (School Bus) भेट दिली आहे. या बसमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करण्यासाठीचा प्रवास सुरक्षित होणार असून या भेटीबद्दल लोणी धामणी ग्रामस्थांनी पुनीत बालन यांचे आभार मानले आहेत. (Punit Balan Group)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या (Indrani Balan Foundation) माध्यमातून लोणी धामणी गावात अनेक विकासकामे सुरू आहेत. या गावातील शाळेची भव्य अशी इमारत फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येत असून लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गावातील नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याचे तळेही बाधण्यात आले आहे. यामुळे याभागतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. (Punit Balan Group)
याशिवाय गतवर्षी पुनीत बालन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या गावाला रुग्णवाहिकाही (Ambulance) भेट दिली होती. त्यामुळे गावातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त शाळेसाठी आवश्यक असलेल्या बसच्या रक्कमेचा धनादेश लोणी धामणी गावातील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीला सुपूर्द केला. काही दिवसातच ही बस प्रत्यक्षरित्या विद्यार्थांना मिळणार आहे. हा धनादेश स्वीकारताना गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड (Kailash Gaikwad), समन्वयक चेतन लोखंडे (Chetan Lokhande), माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज , खजिनदार बाळासाहेब गायकवाड, सचिव डॉ. अविनाश वाळुंज, सदस्य राजेश वाळुंज हे उपस्थित होते.
- मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती
- फ्लॅटचा ताबा न देता ज्येष्ठ महिलेची फसवणूक, दोघांवर FIR; विश्रांतवाडी परिसरातील प्रकार
- पुणे एअरपोर्ट येथे नोकरी देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, विश्रांतवाडी परिसरातील घटना
- कोंढवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्यास जाब विचारणाऱ्या आईला धमकी; रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल
- येरवडा: तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असे म्हणत शाळकरी मुलीवर बलात्कार
- लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्या गुंडाला अटक