Pune Crime News | पुण्यात तब्बल 4970 किलो बनावट पनीरचा साठा जप्त, कर्नाटकातून आणलेल्या पनीरची छोट्या हॉटेल अन् दुकानदारांना विक्री; गुन्हे शाखेची मोठी कारवाई (Video)
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात बनावट पनीरची विक्री (Fake Paneer) करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी आणले जाणारे 10 लाखाचे 4 हजार 970 किलो बनावट पनीर जप्त (Seized) केले आहे. (Pune Crime News) हे बनावट पनीर पुणे शहरातील लहान हॉटेल आणि दुकानदारांना विक्रीसाठी दिले जात होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर व त्यांच्या पथकाला माहिती मिळाली होती की, कर्नाटक राज्यातून (Karnataka State) एका टेम्पोमध्ये बनावट पनीर पुण्यात आणले जात आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने व अन्न व औषध प्रशानाचे अधिकारी क्रांती बारवकर (Food and Drug Administration Officer Kranti Barwakar) यांनी कात्रज चौकात सापळा रचला. त्यावेळी एक टेम्पो कर्नाटकातून पुणे शहरात येत असताना पकडला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये बनावट पनीर आढळून आले. ही कारवाई 5 जुलै 2023 रोजी करण्यात आली.
https://www.instagram.com/reel/CwhgMKwp3Jv/?utm_source=ig_embed&ig_rid=8a1feea9-8360-43e1-9e3a-0086d138c637
यानंतर जप्त करण्यात आलेले पनीर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी (दि.28 ऑगस्ट) पोलिसांना प्राप्त झाला. पोलिसांनी जप्त केलेले पनीर भेसळयुक्त असल्याचे तसेच मानवी शरीरास घातक असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले. पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचे 4 हजार 970 किलो लुज पनीर नष्ट केले असून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून आणि अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior PI Ashok Indalkar),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil),
पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख (PSI Shahid Shaikh), अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील यांच्या पथकाने केली.
Comments are closed.