पुणे : बहुजननामा ऑनलाईन – फिरस्त्या कुत्र्याने जेष्ठ नागरिकाचा चावा घेतल्यानंतर कोंढवा(Kondhwa) परिसरातील दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एका महिलेच्या घरावर दगडफेक करत नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, कुत्र्याच्या हल्यात जेष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. कोंढवा(Kondhwa) परिसरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी 64 वर्षीय जेष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या प्राणी मित्र आहेत. त्यांनी फिरस्ते कुत्रे गोळा करून त्यांना आपल्या घरात ठेवले आहे. साधारण 10 ते 12 कुत्री आहेत. तर त्या कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर येथे राहतात. यात तीन दिवसांपूर्वी एक भटके कुत्रे येथून जाणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाला चावले. यात जेष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. या रागातून दुपारी 10 ते 15 जणांनी फिर्यादी यांच्या घराचे पत्र्याचे कंपाऊंड दगडाने मारून पाडले. तर त्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच त्यांच्या घरात असलेल्या कुत्र्यांना दगडाने मारले आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
शहरात प्राणी मित्र भटक्या श्वानाना सकाळ-संध्याकाळ खायला देत असतात. विविध भागात हे चित्र पाहायला मिळते. प्राणी मित्र त्या-त्या भागात जाऊन खायला घालत असताना स्थानिक नागरिकांचे आणि त्यांच्यात वाद होत असल्याचे पाहिला मिळते. तर, अनेक भागात या भटक्या कुत्र्यांचा त्रास भयावह आहे. रस्त्यांवर हे भटकी कुत्री घोळक्याने बसलेले असतात. गाडी आल्यानंतर त्याच्या मागे धावतात. त्यामुळे चालक जीव मुठीत धरून वाहन चालवतात. त्यातही रात्री या भटक्या कुत्र्यांचा त्रास जास्तच आहे. अनेकजण तो रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने जातात. अनेकांचा अपघातही झाला आहे.
12 वी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल
कोरोनावर चमत्कारी औषधाचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा कोरोनानेच मृत्यू
7 लाखांच्या रूग्णवाहिकेची तब्बल 21 लाखांत खरेदी, जाणून घ्या प्रकरण