नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोव्हिडनंतर होणाऱ्या आरोग्यासंदर्भातील तक्रारींमुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज (मंगळवार) CBSE आणि ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षासंदर्भात निर्णय घेतला जाणार होता. मात्र, डॉ. निशंक यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती.
Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank admitted to AIIMS due to post COVID complications today: AIIMS officials
(File pic) pic.twitter.com/w1xMx8xhmt
— ANI (@ANI) June 1, 2021
बारावीच्या परीक्षासंदर्भात 1 जून रोजी निर्णय घेतला जाईल आणि त्यासाठी बैठकही होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यापूर्वीच पोखरियाल यांना एम्समध्ये AIIMS दाखल करण्यात आलं आहे. सीबीएसई बोर्डाकडून बारावीच्या परीक्षांबाबत जो काही निर्णय घेतला जाईल त्याचा परिणाम विविध राज्यातील बारावीच्या परीक्षांवर होण्याची शक्यता आहे.
डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी देखील त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी शिक्षण मंत्रालयाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बैठकांमध्ये सहभागी होत होते. दरम्यान, कोरोनानंतर कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
कोरोनावर चमत्कारी औषधाचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा कोरोनानेच मृत्यू
7 लाखांच्या रूग्णवाहिकेची तब्बल 21 लाखांत खरेदी, जाणून घ्या प्रकरण