7 लाखांच्या रूग्णवाहिकेची तब्बल 21 लाखांत खरेदी, जाणून घ्या प्रकरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाने हाहाकार केला आहे. एकीकडे आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तरीही सरकार सर्वातोपरी प्रयत्न करत आहेत. तर कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक प्रकार पुढं येत आहे. अशातच बिहार राज्यातील रुग्णवाहिका Ambulance खरेदीमध्येच मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ७ लाख किंमतीची रुग्णवाहिका Ambulance ही सुमारे २१ लाख रुपयात खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णवाहिकेच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहितीप्रमाणे, बिहामधील सिवान जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. सिवानचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. मागील वर्षी रुग्णवाहिका सामान्य दरापेक्षा तिप्पट पैसे देऊन खरेदी केली गेली. परंतु, इतक्या रकमेने खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचा आतापर्यंत एकदाही वापर केला नाही. हि घटना पुढं आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या संकटात रुग्णवाहिकेची कमतरता होती म्हणून खरेदी झाल्याचं म्हटलं जात.
या दरम्यान, एका हिंदी वेबसाईटच्या वृत्तानुसार, रुग्णवाहिकेचा दर ७ लाख सांगितली जात आहे. त्या रुग्णवाहिकेसाठी अपग्रेडेशनच्या नावाने ६ लाख ७२ हजारांचं बिल पास केलं गेलं. तसेच आरोग्य उपकरणाच्या नावाने जवळपास ६ लाख आणखी घेतले गेले, दरम्यान, आगामी काही दिवसामध्ये रुग्णवाहिकेच्या घोटाळा प्रकारामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते.
महिलेकडे सापडले असे ड्रग्स जे 10 लाख लोकांचा जीव घेऊ शकते
गर्भावस्थेमध्ये व्हॅक्सीन घेऊ शकतो का? जाणून घ्या होणार्या मुलावर त्याचा काय होणार परिणाम
डोळ्यांच्या समस्येपासून ‘कब्ज’मध्ये देखील फायदेशीर ठरतात हिरवे धणे, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे
Comments are closed.