बहुजननामा ऑनलाईन टीम – अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये पकडलेल्या एका महिलेजवळ तब्बल 2 किलोग्रॅम Fentanyl हे ड्रग्स( Fentanyl drugs) सापडले असून जे कमीत कमी 10 लोकांचे जीव घेऊ शकते. पोलिसांनी महिलेला क्लब बॉलवार्ड अॅन्ड वॉट्स स्ट्रीटजवळ अडवून तिच्या कारची तपासणी केली. त्यावेळी तिच्याकडे 2 किलोग्रॅम सिंथेटिक ओपिओइड Fentanyl ड्रग्स( Fentanyl drugs) आढळले. कारमध्ये कॅरनसोबत तिची 4 वर्षांची मुलगीही सोबत होती. चौकशीनंतर पोलिसांनी मुलीला परिवाराकडे सोपवले आहे.
कॅरन ग्रासियाला (वय 24) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. कॅरनवर आता ड्रग्स तस्करी आणि बाल शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिला 72 लाख रूपयांचा सुरक्षित बॉन्ड द्यावा लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार, ड्रग इंफोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटनुसार, Fentanyl एखादी जुनी वेदना दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. किंवा याचा वापर एखाद्या सर्जरी दरम्यानही केला जातो. हे औषध मॉरफिनपेक्षा 100 पटीने अधिक परिणामकारक असते. रूग्णांना हे औषध केवळ मेडिकल प्रोफेशनल्सच देऊ शकतात. याचा चुकीचा वापर करण्याचीही अनेकदा शक्यता असते. असा अंदाज आहे की हे 1 किलो ड्रग्ज 5 लाख लोकांचा जीव घेऊ शकते. हे ड्रग्स इतर काही बेकायदेशीर ड्रग्समध्ये मिश्रित करून स्प्रे आणि पावडर बनवून विकले जाते. CDC च्या रिपोर्टनुसार यात 72 टक्के लोकांचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे होतो, असे म्हटले आहे.
गर्भावस्थेमध्ये व्हॅक्सीन घेऊ शकतो का? जाणून घ्या होणार्या मुलावर त्याचा काय होणार परिणाम
डोळ्यांच्या समस्येपासून ‘कब्ज’मध्ये देखील फायदेशीर ठरतात हिरवे धणे, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे