मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेच्या निर्मात्यांना मनसेने दम दिला असून ‘मुंबईची आमभाषा ही हिंदी आहे’ या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईची आम आणि खास भाषा मराठी असून आपल्या वक्तव्यावर मराठी माणसांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. यानंतर मालिकेने एक नवीन व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी मराठी लोकांची माफी मागितली आहे. तसेच सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत असून त्यात कन्नडी भाषिकांचे मराठीवरील प्रेम दिसून येत आहे.
चंपक चाचा यांचा सोशल मीडियावर मुंबईतील भाषा हिंदी आहे असा सुविचार हिंदीत लिहिला पाहिजे, असे विधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरूनच मनसेने आक्षेप घेतला होता. या व्हिडिओमध्ये ‘आपली गोकुलधाम कुठे आहे मुंबईत? आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा संवाद त्यांनी एका एपिसोडमध्ये केला होता. त्यावर मनसेचे अमेय खापेकर यांनी त्यावर आक्षेप घेत ‘हेच ते मराठीचे मारक मेहता’ असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यांची मस्ती उतरवावीच लागेल, असेही ते म्हणाले होते. चंपक यांच्या या विधानाचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध नोंदवत असून महाराष्ट्राची भाषा मराठी असून माफी मागा, असे सांगितले आहे. यानंतर मालिकेतील संबंधित कलाकारांनी माफी मागितली असून मुद्दा शांत झाला आहे. पण आता सोशल मीडियावर एका कन्नड भाषिक जोडप्याचा फोटो व्हायरल होत असून जोडप्याच्या हातात एक फलक दिसत आहे. त्यावर आमची भाषा मराठीच, असा मजकूर लिहिला आहे.
‘आम्ही कानडी आहोत, पण आम्ही मुंबईत राहतो. म्हणून आमची भाषा मराठीच…!’ असा मजकूर लिहिलेला फलक या जोडप्याने आपल्या हातात घेतला आहे. मूळ कर्नाटकचे असणाऱ्या आणि कानडी मातृभाषा असलेले हे जोडप कदाचित मुंबईत राहत आहे. पण या त्यांचे मराठी प्रेम पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना शुभेच्छाही देत असून सोशल मीडियावर सध्या त्यांचा फोटो व्हायरल होत आहे.