नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मोनिका लेव्हीन्स्की यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे कबूल केले आहे. ही गोष्ट आपली पत्नी हिलरी क्लिंटन यांच्यावर हुलू या मीडिया संस्थानच्या एका ‘हिलरी’ या माहितीपटात कबूल केले आहे. या माहितीपटात हिलरी क्लिंटन यांच्या पूर्ण जीवनाची कथा दाखवली गेली आहे.
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी म्हटले आहे की, ज्यावेळी मोनिका लेव्हीन्स्की यांना भेटल्या त्यावेळी कामाचा तणाव होता. प्रत्येक दिवशी खूप जास्त काम होते. कामाचा तणाव कमी करण्यासाठी बिल क्लिंटन यांनी मोनिका लेव्हीन्स्की यांच्यासह शारीरिक संबंध ठेवले होते. बिल क्लिंटन यांनी या माहितीपटात मोनिका लेव्हीन्स्की यांची माफीही मागितली आहे. सोबतच हेही कबूल केले आहे की, मोनिकासोबत असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे जीवन नरक बनले होते.
त्यांनी हेही सांगितले की, जेव्हा तुम्हाला सामान्य जीवन हवे असते आणि कामात खूप दबाव आल्याने अशा चुका होतात. १९९८ मध्ये मोनिका लेव्हीन्स्की प्रकरणानंतर त्यांच्या जीवनात मोठी गडबड झाली होती. बिल आणि हिलरी दोघीही सार्वजनिक ठिकाणी कमी प्रमाणात दिसत होते.
हे प्रकरण २०१८ मध्ये आणखी एकदा समोर आले असताना जेव्हा बिल यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मोनिका लेव्हीन्स्की यांनी माफी मागण्याची गरज नाही. हिलरी क्लिंटन यांनी हा माहितीपटात सांगितले आहे की, जेव्हा त्यांच्या पतीने त्यांना सत्य सांगितले तेव्हा त्या पूर्णपणे हलून गेल्या. त्यांना ते खरे बोलत आहेत यावर विश्वास बसत नव्हता. सत्य सांगितल्यावरही त्यांनी बिल यांचे साथ देण्याचा निर्णय घेतला.
सर्वात वाईट गोष्ट ही की, जेव्हा हिलरी यांच्यासमोर बिल आणि मोनिका यांच्या संबंधाबाबत बिल यांनी आपली मुलगी चेलसीला सांगितले. मुलीने त्यांच्यावर प्रश्न निर्माण केले. तसेच ती अनेक महिने नाराज होती.