नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या चालू असलेल्या परिस्थितीमुळे आणि वेगाने वाढत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे गुंतवणूकदार दंग झाले असून त्यांची नजर आता सुरक्षित गुंतवणुकीकडे आहे. यामुळे दिल्ली सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धांतूंच्या किंमतीच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याच्या भावात ७७३ रु. प्रति ग्रामने वाढ झाली आहे. पण चांदीच्या किंमतीत मात्र १९२ रु. प्रति किलोग्रॅमने घट झाली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल म्हणाले की, आज डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. रुपया ६५ पैशांनी खाली येऊन ७३.९९ वर आला आहे. तर इक्विटी बेंचमार्कमध्येही सुरुवातीला व्यापारादरम्यान १,४०० अंकांनी खाली आला आहे. शुक्रवारी बँकिंग स्टॉकमध्ये सर्वात जास्त विक्री दिसून आली आहे.
सोन्याचे नवीन दर –
शुक्रवारी दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा भाव ७७३ रु. प्रति १० ग्रामने वाढून ४५,३४३ रु. झाला आहे. याअगोदर गुरुवारी सोन्याचा भाव ४४,५७० रु. होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव १,६७८ डॉलर प्रति औस आहे.
चांदीचे नवीन दर –
आज चांदीच्या भावात साधारण घसरण झाली असून शुक्रीवरी दिल्लीच्या सराफ बाजारात एक किलोग्राम चांदीचा भाव १९२ रु.नी कमी झाली असून त्यानंतर आजचा नवीन भाव ४८,१८० रु. आहे. याअगोदर गुरुवारी चांदीचा भाव ४७,९८८ रु. प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव बघाल तर आज चांदीचा भाव १७.३४ डॉलर प्रति औस आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगातील अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत नाहीये.
सुरक्षित गुंतवणुकी पर्यायाकडे सर्वांचे लक्ष –
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे आज सोन्याच्या किंमती वाढत असून गुंतवणूकदारांचा कल अधिक सुरक्षित पर्यायांकडे आहे. चीनबाहेर कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत असून मागच्या काही दिवसांत अमेरिका, भारत, दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये नवीन प्रकरणे समोर आली आहेत.