पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी पूर्व मोसमी(Pre seasonal) पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पूर्वमोसमी(Pre seasonal) पाऊस पडत आहे. रविवारी (दि.30) पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्यांमध्ये पावसाने जोरदार हजरी लावली. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात मान्सूच्या पवासाला अद्याप काही आठवडे बाकी आहेत. असे असताना राज्यात पावसाळ्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे राज्यात एकंदरीत पावसाळा ऋतुचा अनुभव येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासांत पुण्यासह सातारा, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, ठाणे, बीड, परभणी, हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
15/30 hrs
Pune Satara Ratnagiri, Thane, Mumbai and Beed Parbhani Hingoli Ahmednagar possibility of mod to severe TS ⛈️⛈️☂️☁️☂️with rains for next 3, 4 hrs
Mumbai pl watch
Pl see alerts by IMD pic.twitter.com/tjsMnFlXHm— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 31, 2021
हवामान खात्याने मुंबईकरांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुंबईसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे.
वेळेवर ‘व्हॅक्सीन’ टोचून घ्या अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसे
मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या
‘लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी’
कौतुकास्पद ! पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांचे यश; कळसूबाई शिखराच्या माहितीपटाचा जर्मनीत सन्मान
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे