पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मागील दोन महिन्यात पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. मात्र, आता नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 180 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 69 हजार 927 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 24 रुग्ण शहरातील आहेत तर 09 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 256 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 751 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 55 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 439 स्वॅब तपासणी करण्यात आली. आजपर्यंत 24 लाख 96 हजार 737 चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 6 हजार 020 इतकी आहे. यापैकी 844 रुग्ण गंभीर आहेत. तर 1581 जण ऑक्सिजनवर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
‘लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी’
कौतुकास्पद ! पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांचे यश; कळसूबाई शिखराच्या माहितीपटाचा जर्मनीत सन्मान
‘पुण्यातील ‘ड्राइव्ह इन’ व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ अन् दिव्यांगांसाठी वरदान ठरेल’ : अजित पवार
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे
हेल्दी मनुष्याला सुद्धा होऊ शकतो हार्टअटॅक, जाणून घ्या कारणे आणि उपचार