पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्याच्या हडपसर येथे पहिल्या ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं. त्यावेळी लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्यात आलीय. तिथे लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल. याद्वारे लसीकरण Vaccination वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. तसेच, परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार Ajit Pawar म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे. राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज आहे. पुणे जिल्हा लसीकरणात Vaccination आघाडीवर आहे. हडपसरमधील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा मला विश्वास आहे. असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारने तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत अन्य संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, यासंदर्भात दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी एकजुटीनं कोविड संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं जनतेनी काटेकोरपणे पालन करा. अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
कौतुकास्पद ! पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांचे यश; कळसूबाई शिखराच्या माहितीपटाचा जर्मनीत सन्मान
‘पुण्यातील ‘ड्राइव्ह इन’ व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ अन् दिव्यांगांसाठी वरदान ठरेल’ : अजित पवार
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे
हेल्दी मनुष्याला सुद्धा होऊ शकतो हार्टअटॅक, जाणून घ्या कारणे आणि उपचार