मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नेहमीच ग्लॅमरस फोटो टाकणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने (amruta khanwilkar) आपल्या चाहत्यांना चकीत केले आहे. यावेळी अमृताने (amruta khanwilkar) योगा पोजमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
अमृता खानविलकरने नुकतेच इंस्टाग्रामवर योगा पोजमधील व्हिडीओ शेअर करत लिहिले होते की, नवीन सीरिज, लवकरच येणार. या पोस्टमधून लक्षात येते आहे की अमृता योगा पोझमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरीत करणार आहे. अमृता खानविलकर योगाचे धडे रसिका क्षिरसागरकडून गिरविते आहे. तिने योगा पोझमधील फोटो शेअर करत म्हटले की, “तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही मजबूत असता. असे माझ्या शिक्षिका सांगतात. रसिका क्षिरसागर मी तुझी आभारी आहे माझ्यासोबत असण्यासाठी आणि मला प्रशिक्षण देण्यासाठी.” दुसऱ्या योगा पोझमधील फोटो शेअर करून अमृताने लिहिले की, “सर्व काही शक्य आहे, यावर विश्वास ठेवा.” आणखी एक फोटो शेअर करत म्हटले की, “सोपे काहीच नसते, मजबूत बनता.”
अमृता खानविलकर शेवटची ती मराठी चित्रपट ‘चोरीचा मामला’मध्ये झळकली होती. यात तिच्यासोबत जितेंद्र जोशी, क्षिती जोग, हेमंत ढोमे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर आगामी चित्रपट ‘पाँडिचेरी’मध्ये दिसणार आहे. या सिनेमात अमृता सोबत सई ताम्हणकर व वैभव तत्ववादी आणि नीना कुलकर्णी दिसणार आहेत. अमृता खानविलकरच्या या फोटो आणि कॅप्शनमधून लक्षात येते की ती फिटनेस फ्रिक झाली आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि ते तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
राज्यात पूर्व मोसमी पावसाचा तडाखा सुरुच, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धारा
वेळेवर ‘व्हॅक्सीन’ टोचून घ्या अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसे
मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या
‘लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी’
‘पुण्यातील ‘ड्राइव्ह इन’ व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ अन् दिव्यांगांसाठी वरदान ठरेल’ : अजित पवार