पुणे : बहुजननामा ऑनलाईन – एका 25 वर्षीय विवाहितेनं नवरा नपुंसक असल्याचं कळाल्यानंतर पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर विवाहितेनं (दि 6) या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विवाहितेच्या तक्रारीनंतर पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात विवाहितेचा छळ आणि फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितले की, समोर आलेली घटना 5 फेब्रुवारी 2018 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी आणि वडगाव शेरी, पुणे येथे घडली. लग्न झाल्यानंतर पतीनं वैवाहिक सुखापासून दूर ठेवलं. कारण पती नपुंसक होता. याशिवाय सासरच्या मंडळींनीही तो नपुंसक असल्याची माहिती लपवून ठेवली होती. इतकेच नाही तर पतीनं इतरांशी असलेल्या शारीरिक संबंधांचे फोटो आणि व्हिडीओ क्लीप आपल्याला पाठवली.
लग्नात मानपान दिला नाही म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला सासरी ठेवण्यास नकार देत आई-वडिलांकडे सोडून दिलं. धक्कादायक बाब अशी की, फिर्यादिलाच सासरकडील मंडळींनी 5 लाख रुपयांची मागणी केली.
दरम्यान या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.