बहुजननामा ऑनलाईन टीम – उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या मृत्यूनंतर देशभरातुन संताप व्यक्त झाला आहे. उन्नावपासून लखनऊ आणि दिल्लीपर्यंत जोरदार निदर्शने होत आहेत. शनिवारी सायंकाळी दिल्लीच्या राजघाट ते इंडिया गेटपर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, आंदोलकांचा रोष अधिक वाढला. निदर्शकांनी पुढे जाऊन पोलिसांचे बॅरिकेड तोडले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी वॉटर कॅनॉनचा वापर केला आणि थंडगार पाण्याने रात्री निदर्शकांवर वर्षाव केला.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या नेतृत्वात हा मेणबत्ती मार्च निघाला होता. स्वाती मालीवाल हे राजघाट येथे आमरण उपोषणास बसले होते. आज त्या राजघाट ते इंडिया गेटपर्यंत कॅन्डल मार्चवर निघाल्या आहेत. दरम्यान, पोलिस आणि निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान बर्याच मुली बेशुद्ध झाल्या आहेत. अनेक निषेध करणार्या मुली आणि महिलांनाही दुखापत झाली आहे. निषेध करणार्यांच्या हातात फलक असून ‘आम्हाला न्याय हवा आहे’ अशी ओरड केली जात होती.
Delhi: Protesters who are holding a candle march from Raj Ghat to India Gate try to jump barricades. https://t.co/7eJ9NwQheW pic.twitter.com/oe8sMiXviK
— ANI (@ANI) December 7, 2019
लखनऊमध्ये पोलिसांचा कॉंग्रेसवाल्यांवर लाठीमार
शनिवारी सकाळी दिल्लीत मेणबत्ती मोर्चाच्या आधी पोलिसांनी लखनऊमध्ये आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर लाठीमार केला, उन्नावमधील पीडित कुटुंबाला भेट देणारे भाजप खासदार साक्षी महाराज, मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि कमलाराणी यांच्याविरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Delhi: Police use water canons on protesters who were holding a candle march from Raj Ghat
to India Gate. Protestors are demanding justice for the Unnao rape victim who died yesterday. pic.twitter.com/Q4g9ETtDRe— ANI (@ANI) December 7, 2019
उन्नाव येथे आंदोलन सुरू असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा लखनऊ येथील हजरतगंजमध्ये रस्त्यावर उतरले. याशिवाय शनिवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले.